आज खूप बरं वाटलं...आमचा लाल आणि पिवळ्या रंगाचा जुना कापडाचा आकाशकंदील मी रंगवायला घेतला.. आणि थोड्याच वेळात तो रंगून नवीन दिसायला लागलाय...! मी वेग-वेगळे रंग वापरले आणि तो पूर्वीपेक्षा सुंदर दिसतोय आता..गोमंतकच्या दिवाळी अंकात कविता छापून आली आणि परमानंद झाला!घरच्या सगळ्यांना कविता फारच आवडली आहे... Background मस्त घातलाय! चित्रही छान दिलंय..
मांजराची पिल्लं थोडूश्शी मोठी झालीयेत.. मिऊ मिऊ करतात नुसती! त्यांनाही दिवाळीचे वेध लागलेत बरंका! :) कॉलेजमध्ये जाऊन dance practise करतेय अधून मधून... मस्त मराठी गाणं मिळालंय...
"वृंदावनी सारंग हा का लावी घोर जीवाला
झाली अशी वेडी-पिशी कुणी जाउनी सांगा त्याला...
हा मंद गंध भवताली राधेला वाट गवसली
कधी सारे सरे परतुनी सूर-सूर येती कानी
सा सा सा प प प म म प ध प म ग रे म प
राधे-कृष्ण राधे-कृष्ण राम, घे गवळण राधा
राधे-कृष्ण राधे-कृष्ण राम..........."